घनसावंगी तालुक्यातील हिकमत बळीराम उढाण शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई चे अधिकृत उमेदवार म्हणुन धनुष्यबाण या चिन्हावर लढत असुन त्यांनी आज आपला फॉर्म भरला...
शिवसेना पक्षातर्फे मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याचे पत्रक मिळाले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो !!
हे माझ्यासाठी केवळ तिकीट नाही, तर जनतेचे माझ्यावरचे प्रेम आणि विश्वास आहे, ज्यामुळे मला ही उमेदवारी मिळाली आहे.
माझे जीवन हे जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. या उमेदवारीमुळे मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करणे, रोजगार निर्माण करणे, शिक्षणात सुधारणा करणे तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे मुद्दे घेऊन मी तुमच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
तुमच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करणे हेच माझे ध्येय आहे.
तुमच्या आशीर्वादाने आणि समर्थनाने या निवडणुकीत विजयी होऊन, अधिक जोमाने तुमच्यासाठी कार्य करण्याचा संकल्प मी करत आहे .
त्यासाठी समस्त घनसावंगी मतदारसंघातील मायबाप मतदारांचे शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव पाठीशी राहू दे हीच सदिच्छा !!
*हिकमत बळीराम उढाण*
*शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई चे अधिकृत उमेदवार*
*चिन्ह - धनुष्यबाण*
तुळजाई न्युज
9765879656
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा