घनसावंगी मधून निष्टावंत शिवसैनिकाला उमेदवारी .....,

    शिवसेनेच्या वतीने निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी मिळेल, परंतु पक्षाने विचार केला नाही तर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरु अशी घोषणा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर यांनी केली आहे.

 याबाबत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर यांनी सांगितले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन आजपर्यंत निष्ठावंत म्हणून पक्षात काम करीत आहे. पक्षासाठी शेतकऱ्यासाठी आंदोलने केली. आपल्यावर गुन्हेही दाखल झाले आणि तुरुंगात सुद्धा जावे लागेल.  माजी मंत्री तथा राज्यमंत्री शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक सच्चा समर्थक आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आपण कार्यरत आहोत यावेळी एका सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल याची आपणास खात्री आहे. मागील तीन वर्षात घनसावंगी येथे स्वतंत्र कार्यालय उघडून आपण का सर्वांची सुख  दुःखात सहभागी होऊन पक्ष वाढीसाठी सतत झटत आहोत त्यामुळे या पक्षाने आपला विचार करून मला घनसांगीतून उमेदवारी  ही द्यावी,  अशी अपेक्षा आहे.

     पक्षाने विचार न केल्यास जनशक्तीच्या जोरावर आपण निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. मराठा आरक्षणाचे  संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याही दोनदा भेट घेतली आहे. त्यांनीही  अनुकूलता दाखवली आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा लढाईत सामान्य कार्यकर्ताचा निश्चित विजय होईल, असा आपला ठाम विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट