संविधान बदल हा हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. गव्हाळे
सांगली : २० ऑक्टोबर २०२४
संविधान स्वतः चे रक्षण स्वतः करू शकते अशी त्याची रचना बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. कोणी काहीही केले तरी संविधानाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावता येणार नाही. असे मत ऍड विजय गव्हाळे यांनी सामाजिक संवाद मेळाव्या मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
काँग्रेसने ४२ वी घटना दुरुस्ती केली होती व देशावर आणीबाणी लादून संविधानाचा गळा घोटण्याचे काम केले. परंतु भारतातील लोकशाहीवादी जनतेने लाखोंच्या संख्येत तुरुंगवास भोगून इंदिरा गांधी यांची हुकूमशाही मोडून काढली. राहुल गांधी हे बाहेरच्या देशात जावून “आम्ही आरक्षण संपवू” असे म्हणतात. संविधानाची मोडतोड काँग्रेसनेच केलेली आहे. देशाने राज्यघटना स्वीकारल्यानंतर निवडणूका झाल्या त्यामध्ये खरतर घटना निर्माते बाबासाहेबांना बिनविरोध निवडून द्यायला हवे होते पण काँग्रेस ने निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव केला. एकदा नाही तर दोनदा पराभव करून नेहरूंनी बाबासाहेबांचा अवमान केला असल्याचे मत गव्हाळे यांनी व्यक्त केले.
विवेक विचार मंच तर्फे सामाजिक संवाद मेळाव्याचे आयोजन हॉटेल देवगिरी येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मंचावर विवेक विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागर शिंदे, सांगली जिल्हा संयोजक ऍड अमोल बोळाज उपस्थित होते.
या सामाजिक संवाद मेळाव्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, सामाजिक न्याय, शासकीय योजना या संदर्भात चर्चा व मोकळेपणाने संवाद झाला. सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी याबाबतीत आपली मते मांडली.
सागर शिंदे यांनी सर्वांच्या सोबत संवाद साधला ते म्हणाले, भारतीयांच्या एकतेचे सूत्र संविधान आहे. कम्युनिस्ट माओवादी, इस्लामिक कट्टरतावादी संघटना तसेच फुटीरतावादी संघटनांकडून भारतीय संविधानाला धोखा आहे. लोकशाहीवादी जनतेने सावध राहिले पाहिजे. सध्या समाजात अनेक चुकीचे विमर्श पसरवले जातात.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऍड अमोल बोळाज यांनी आणि सूत्रसंचालन ऍड अनिल माने यांनी केले. हा सामाजिक संवाद मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रदीप कांबळे,दादा कांबळे,संदिप तात्या ठोंबरे,रविंद्र सनके,विनय संपकाळ,प्रताप जामदार,दिलीप पवार,उदय मूळे, स्नेहलताई जगपात,रवींद्र वदवणे,शुभम चव्हाण,डॉ गणेश चौगुले,प्रशांत चिपळूणकर,शंकर आवळे,सतीश बल्लाळ,भरत बर्गे यांनी विशेष प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा