जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने जिल्हा प्रशासन व राज्य सरकारचा GR ची होळी करून जाहीर निषेध व्यक्त केला

 


राज्य सरकारचा जाहीर निषेध..   

   2 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये मुसळधार अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे तसेच फळ पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. तरी ही शासनाच्या अनुदानातून जालना जिल्हा वगळण्यात आले आहे.

    4 ऑक्टोंबर महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयात 997 कोटी रुपयांची मदत अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली. मात्र यात जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने जिल्हा प्रशासन व राज्य सरकारचा  जाहीर निषेध व त्या नंतर मानवी साकळी करून तहसील कार्यालयाला वेढा दिला.

  जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता 30 सप्टेंबर 2024 पासून घनसावंगी तहसील समोर शेतकरी पुत्र गजानन उगले यांचे आमरण उपोषण सुरू आहे परंतु प्रश्न प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल आजपर्यंत न घेतल्यामुळे राजेगाव तालुका येथील महिला भगिनींनी घनसावंगी तहसीलदार यांच्या दालनामध्ये त्यांच्या समर्थनात हे आंदोलन केले त्यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत व तोपर्यंत गजानन उगले देखील आमरण उपोषण माघार घेणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले जो पर्यंत आम्हाला लेखी हमी देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट