शिवसेनेचे अर्जुन खोतकर जालन्यात 20, 000 + मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या कैलास गोरतयाल यांचा पराभव झाला आहे...
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यात 20 नोव्हेंबरला 288 जागांसाठी विधानसभा निवडणूकीच मतदान झालं. निवडणूक आयोगाकडून सध्या मतमोजणीनंतर निकाल येत आहे. 288 जागांपैकी 46 जागा असणाऱ्या मराठवाड्यात कुठला पक्ष निवडून येतो किंवा कुठल्या उमेदवाराची सरशी होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचे केंद्र राहिलेल्या जालना जिल्ह्यात कोण बाजी मारतय हे आता समोर आलं आहे. अर्जुन खोतकर राजेश टोपे यांच्यासारखे बडे नेते जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे अर्जुन खोतकर जालन्यात 20, 000 + मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या कैलास गोरतयाल यांचा पराभव झाला आहे .
शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षेप्रमाणे विधानसभेच्या जालना मतदारसंघातून अर्जून खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी मिळाली तर जालन्यात खोतकर विरुद्ध गोरंट्याल हे पाचव्यांदा एकमेकांच्या विरोधात लढतील. तर खोतकर हे आठव्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरत आहेत.2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंटीलाल यांना २९६ च्या फरकाने पराभूत केले होते . सलग दुसऱ्या वेळेस अर्जुन खोतकर विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे . 2024 मध्ये लोकसभेच्या जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे.कैलास गोरंट्याल आणि रावसाहेब दानवे यांची मैत्री, लोकसेभेत महायुती असून खोतकरांनी विरोधात केलेले काम याचा परिणाम विधानसभेला दिसू शकतो असे बोलले जात होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा