साला बाद प्रमाणे गेटू गेदर चा (स्नेहभोजनाचा) कार्यक्रम सरफगव्हाण येथे पार पडला...

साला बाद प्रमाणे गेटू गेदर चा (स्नेहभोजनाचा) कार्यक्रम सरफगव्हाण येथे पार पडला...  सालाबाद प्रमाणे 2008 -09 दहावीची   बॅच   महात्मा फुले विद्यालय पानेवाडी येथे दहावी मध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी वर्ग मित्र हे दरवर्षी दिवाळी नंतर एकत्र येऊन भेटतात. यांचे नियोजन 2012 ला आमचे मित्र राजेंद्र अटकळ यांनी या कार्यकमाची सुरुवात केली असुन व तो आज पर्यंत चालु आहे.  आतापर्यंत प्रत्येक गावी दिवाळीनंतर सर्व मित्रमंडळी एका ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम ठेवतात त्याचप्रमाणे यंदाही हाच नियमाने कार्यक्रम हा सरफ गव्हाण येथील मित्र मंडळ यांनी घेतला होता. त्यांनी जेवणाची नियोजन योग्य आणि चांगल्या प्रकारे केल्याबद्दल सर्व मित्रमंडळींनी  त्यांचे आभार व्यक्त करून जेवणाचा स्वाद घेतला. आणि पुढील कार्यक्रम हा आमचे वर्ग मित्र नितीन येवले यांनी   संबोधित केले नंतर योगेश गिरी यांनी कार्यक्रम संपला असे जाहीर करून पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आवलगाव खुर्द यांनी घेतल्याचे घोषित करून त्यामध्ये  मित्र सिध्दार्थ सुरडकर , भगवान सुरडकर  यांनी पुढच्या वर्षीचे कार्यक्रमाचे नियोजन घेतले आहे. आणि दिवाळीनंतर हा कार्यक्रम परत असाच चालू राहा यासाठी त्यांनी पुढच्या वर्षीचे जेवणाचे आमंत्रण- निमंत्रण मित्रांना     दिले.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट