कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालया समोर शेतकऱ्यांचे ठीया आंदोलन....
वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे. वैजापूर येथे शेतकऱ्यांचे २ कोटी पेक्षाही अधिक रक्कम व्यापाऱ्याकडे असल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर ठीया आंदोलनास सुरुवात केली आहे. वैजापूर येथील कांदा मार्केट येथे सागर राजपूत या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे २ कोटीपेक्षाही अधिक रक्कम त्या व्यापाऱ्याकडे थकीत आहे. पण तो व्यापारी पैसे देण्याची टाळाटाळ करत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी बापू जाधव व संचालक संजय पाटील निकम यांच्याकडेही शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. त्यावेळेस त्यांनी असे सांगितले की तुमचे पैसे कुठेही जाणार नाही आम्ही जबाबदार आहोत त्या व्यापाऱ्याने नाही दिले तरी कृषी बाजार समिती एकाही शेतकऱ्याची पैसे बुडवणार नाही असे सभापती रामहरी बापू जाधव व संचालक संजय पाटील निकम यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे व सागर राजपूत या व्यापारावरती कारवाई करू अशी आश्वासन सभापती व संचालक यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
सध्या आचारसंहिता चालू असल्याकारणाने थोडे दिवस थांबवावे लागतील असे त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितले. त्यावर शेतकरी म्हणाले की आम्ही २५ नोव्हेंबर पर्यंत वाट बघू नाहीतर त्यानंतर शेतकरी काय करतील ते सांगता येणार नाही व त्याला जबाबदार कृषी बाजार समिती राहील असे शेतकऱ्यांनी सभापती रामहरी बापू जाधव व संचालक संजय पाटील निकम यांना स्पष्ट सोबत सांगितलेले आहे. त्यावर त्यांनी असे सांगितले की तसे वेळ शेतकऱ्यावरती येणार नाही आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची पैसे देण्यात येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा