छत्रपती संभाजीराजेंनी दाखवला कार्यकर्त्यांवर विश्वास : सर्व ठिकाणी विस्थापितांना उमेदवारी देऊन दिलेला शब्द पाळला !
छत्रपती संभाजीराजेंनी दाखवला कार्यकर्त्यांवर विश्वास : सर्व ठिकाणी विस्थापितांना उमेदवारी देऊन दिलेला शब्द पाळला !
राजकारणात सर्वच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना व विस्थापितांना संधी देण्याच्या वल्गना नेहमीच करत असतात. मात्र निवडणूक लागली की हे सर्वच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना व विस्थापितांना विसरून मोठ्या नेत्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकताना दिसतात. घराण्याची राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक ताकद हे निकष लावून पक्षासाठी झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना व चळवळीतील विस्थापितांना उमेदवारी देताना डावलले जाते. राज्याच्या राजकारणात एक नेता याला अपवाद ठरला आहे, ते म्हणाले स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजोराजे !
संभाजीराजे यांनी दोन वर्षांपूर्वी तुळजापूर येथे स्वराज्य संघटनेची स्थापना करत असतानाच ही संघटना भविष्यात पक्ष म्हणून कार्यरत होणार असल्याचे व प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना संधी देणार असल्याची स्पष्ट घोषणा केलेली होती. संघटना वाढवण्यासाठी सर्वच नेते करतात, तशीच संभाजीराजेंनी देखील हे आश्वासन दिले असेच प्रथमदर्शनी वाटले. मात्र दोन वर्षांतील स्वराज्य संघटना व नंतर पक्षाची वाटचाल पाहता संभाजीराजे विस्थापितांना सोबत घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहिल्याचेच दिसून आले.
विशेष म्हणजे निवडणुका लागल्यावर सामान्य कार्यकर्त्यांना विसरण्याची गलिच्छ राजकीय प्रथा मोडीत काढत संभाजीराजे यांनी आपल्या पक्षातून सर्व ठिकाणी केवळ आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना व सामाजिक चळवळीतील विस्थापितांना उमेदवारी दिलेली आहे.
छत्रपती संभाजीराजे हे आपल्या स्वराज्य पक्षातर्फे राज्यातील विधानसभेच्या ३३ जागा लढवत असून या सर्व जागांवर संभाजीराजे यांनी पक्षवाढीसाठी झटलेले कार्यकर्ते व राजकीय पार्श्वभूमी नसलेले, घराणेशाही नसलेले यांमुळे सदैव प्रस्थापितांनी डावललेले सामाजिक चळवळीतील विस्थापित कार्यकर्ते यांना उमेदवारीची संधी दिलेली आहे.
झाडून सगळेच नेते व पक्ष कार्यकर्त्यांना व विस्थापितांना संधी देण्याच्या घोषणा करत असतात पण अशा घोषणेची शंभर टक्के अंमलबजावणी करणारे व दिलेला शब्द तंतोतंत पाळणारे मात्र स्वराज्य पक्ष व संभाजीराजे हे एकमेव नेते सध्या राज्याच्या राजकारणात दिसून येत आहेत.
याविषयी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “आजवर सर्वच पक्षांनी आपापली राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी प्रस्थापितांचे नेतृत्त्व जनतेवर लादले. स्वराज्य पक्षाने खऱ्या अर्थाने विस्थापितांना न्याय दिल्याने लोक आता जनतेशी व मातीशी नाळ असलेला सर्वसामान्य कार्यकर्ताच आपला
#महाराष्ट्र_स्वराज्य_पक्ष #स्वराज्य

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा