मानवत येथील नगर परिषद कार्यालयात मतदार जनजागृतीचे आयोजन..


प्रतिनिधी :- अहमद अन्सारी  परभणी
९८-पाथरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्वीप टीम द्वारे पाथरी शहरी भागात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी,पाथरी मा.शैलेश लाहोटी, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मा.शंकर हांदेशवार, तहसीलदार मानवत मा.पाडुंरंग माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेचगटशिक्षणाधिकारी तथा स्वीप टीम नोडल अधिकारी मा.मुकेश राठोड ,शंकर धावारे सर, धम्मपाल उघडे सर व किशन डहाळे सर यांच्या नेतृत्वाखालील नगर परिषद ,मानवत येथे मतदार जनजागृती संबंधी शपथ देण्यात आली.

तसेच मतदान जागृती विषयीचे बॅनर सर्व कार्यालयात दर्शनी भागात चिटकवण्यात आली.तसेच मतदानाविषयी जनजागृती करण्यात आले.नगर परिषद,मानवत येथे आलेल्या मतदारांना लोकशाही चे महत्व पटवून देण्यात आले.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट