देवगड: कलंबई गावात, श्रीदत्त जयंती उत्सव हिंदू संस्कृती प्रमाणे साजरा
देवगड: देवगड येथे कलंबई गावात रामकृष्ण मुंबरकर व त्यांचे बंधू शिवाजी मुंबरकर व सहकुटुंब सहपरिवार यांनी आपल्या राहत्या घरात श्रीदत्त गुरु जयंती उत्सव अतिशय भक्तिमय, व जल्लोषात साजरा केला, श्रीदत्त गुरु जयंती उत्सव यानिमित्ताने त्यांनी ग्रामस्थांना भोजनाची, पियायच्या पाण्याची, व कोकम सरबते याचे आयोजन केले गेले होते, स्थानिकांना भेटवस्तू सुद्धा श्रीदत्त जयंती निमित्त देण्यात आल्या, गावातील स्थानिक लोकांची उठ बस व देखभाल योग्य रीतीने करण्यात आली होती, स्थानिक लोकांची भजने व प्रवचने हे कार्यक्रम ठेवण्यात आले होते, असा हा श्रीदत्त जयंतीचा उत्सव रामकृष्ण मुंबरकर यांच्या घरी अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला, अनेक श्री दत्तगुरु भक्तांनी त्यांच्या घरी जाऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला, अनेक श्रीदत्तगुरु भक्तांना सुख समाधान लाभो, शांती लाभो ही श्रीदत्त गुरु चरणी प्रार्थना....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा