ना. देसाई यांना दिलेली नेमप्लेट ठरली खरी

तळमावले : ना. शंभूराज देसाई यांनी डाकेवाडी येथे 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट दिली होती. यावेळी डाकेवाडीतील ग्रामस्थांकडून त्यांना नेमप्लेट भेट देण्यात आली होती. त्यावर लिहिले होते शंभूराज वत्सलादेवी शिवाजीराव देसाई - मंत्री महाराष्ट्र राज्य सन 2024 ते 2029. आता देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ही नेमप्लेट चर्चेचा विषय ठरली आहे.
सदर नेमप्लेटवरील जिलेटीन पेपर डॉ. संदीप डाकवे यांनी शंभूराज देसाईसाहेब यांना काढावयास सांगितला. मात्र डाकेवाडी ग्रामस्थांनी ना. शंभूराज देसाई यांना एक भेटवस्तू दिली. ना. देसाई डॉ. संदीप डाकवे यांना म्हणाले, 'संदीप काय भेटवस्तू आहे ती तूच खोलून दे,' सदर वस्तू खोलल्यानंतर ती नेमप्लेट असल्याचे दिसले. त्यावर लिहिले होते. शंभूराज वत्सलादेवी शिवाजीराव देसाई - मंत्री महाराष्ट्र राज्य सन 2024 ते 2029 ही पाटी वाचताच शंभूराज देसाई खूश झाले. शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि डाकेवाडीकर ग्रामस्थांनी प्रचार काळात दिलेली नेमप्लेट खरी ठरली.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट