शिरूर! महाविद्यालयीन युवतीचा साखरपुडा झालेला असताना रस्त्यात अडवले...

शिरूर : महाविद्यालयीन युवतीला रस्त्यात अडवून लग्नाची मागणी घालत विनयभंग करुन युवतीच्या होणाऱ्या पतीला फोन करुन उलटसुलट सांगितल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
शिरुर पोलिस स्टेशन येथे सचिन कैलास गावडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील युवती गावातून महाविद्यालयात जात असताना सचिन गावडे वारंवार तिचा पाठलाग करत तिला रस्त्यात अडवून त्याच्याशी लग्न करण्याची मागणी करत होता. युवतीला अडवल्यानंतर सचिन याने युवतीचा हात पकडून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. ‘तू माझ्याशी लग्न कर अन्यथा मी तुला जगू देणार नाही,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यांनतर नुकताच युवतीचा साखरपुडा झालेला असताना सचिन याने युवतीच्या होणाऱ्या पतीचा मोबाईल नंबर मिळवत त्याला फोन करत युवतीबाबत उलटसुलट बोलून दमदाटी केली.

युवतीने याबाबत शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी सचिन कैलास गावडे (वय २० वर्षे रा. तामखर वाडी टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अरुण उबाळे हे करत आहेत.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट