खादगावाची तूर शेतीपद्धती जिल्ह्यासाठी आदर्श
*डॉ सूर्यकांत पवार यांचे मते*
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तूर गोदावरी वाणाचे गाव म्हटल की खादगाव ता पैठण या गावाचा हमखास उल्लेख करावाच लागेल या गावात सातशे ते आठसे एकर क्षेत्रात हे पीक गावातील शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन केल्याने बहरले आहे असे मत तूर शेतीदिन कार्यक्रमात डॉ पवार यांनी व्यक्त केले.
आज खादगाव येथील प्रगतशील तूर उत्पादक शेतकरी श्रीभागवतराव डाके यांच्या शेतात तूर वान गोदावरी शेतीदिन संपन्न झाला यावेळी तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्षी गोदावरी वाणामुळे आमच्या गवशिवाराचे नक्कीच उत्पादन वाढेल असे शेतकरी आनंदाने म्हणत होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे गोदावरी वान आम्हाला पसंद पडले आहे असे शेतकरी या वेळी म्हणाले या गावात मागील सात वर्षांपासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेले तूर वाणाची लागवड करतात पहिले चार वर्ष बी डी एन 711 आणि मागील तीन वर्षांपासून गोदावरी या बागायती वाणाची शेतकरी लागवड करत आहे अशी माहिती रामेश्वर ठोंबरे यांनी शास्त्रज्ञांना दिली या वानापासून आम्हाला चांगले उत्पादन मिळत आहे अशी माहिती शेतकरी बांधवांनी कार्यालयास आजवर कळविली आहे असे ही ठोंबरे म्हणाले डॉ दीपक पाटील कडधान्य पैदासकार म्हणाले विद्यापीठाला एक वान निर्मिती करण्यासाठी मोठा कालावधी खर्च करावा लागतो तो वेगवेगळ्या अंगाने तपासला जातो त्याला चारही कृषि विद्यापीठाची अनुमती लागते तेव्हा तो वान तुमच्यापर्यंत येतो थोडक्यात विद्यापीठ कोणताही वान शेतकरी बांधवांना देण्यापूर्वी खूप काळजी घेतली जाते म्हणून विद्यापीठ निर्मित वानावर राज्यातील शेतकऱ्याचा विश्वास आहे हा विश्वास आणखी दृढ राहण्यासाठी आणखी जोमाने काम करुअसे म्हणाले सध्या ढगाळ वातारणामुळे तूर पिकावर अरिष्ट आले आहे यामुळे फुल गळ होईल आणि शेंग माशीचा प्रादुर्भाव ही होऊ शकतो त्यासाठी फुलोरा व वादी अवस्थेतील तूर पिकाची काळजी घ्यावी लागेल फुलगळ होऊ नये यासाठी एन ए ए म्हणजेच प्लॅनोफिक्स 2 मिली 10 लिटर पाण्यात फवारणी करावी शिवाय शेंग माशीसाठी. एक कीटकनाशकाची फवारणी करावी खरोखर तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी मेहनत घेवुन या वाणाचे महत्व इतर शेतकऱ्याच्या नजरेत आणले त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्याचे विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन करतो. या वेळी झालेल्या गट चर्चेत अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला यात सोपानराव डाके, सुदाम डाके, भरत जाधव ,धनंजय डाके, डॉ अप्पासाहेब डाके यांनी या पिकाबाबत असणाऱ्या समस्यांची मांडणी केली. या सर्व समस्यांची उकल शास्त्रज्ञांनी केली आज तूर गोदावरी शेती शिवार फेरीत डॉ अप्पासाहेब डाके, श्री सोपानराव डाके श्री सुदाम डाके, ज्ञानेश्वर डाके आदी गोदावरी वान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली. या कार्यक्रमाचे नियोजन स्वतः तूर उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या आनंदाने केले
विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा