पंढरपूरजवळ भाविकांच्या बसला ट्रकची जोरदार धडक, भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू

सोलापूरमधील पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय. दुर्देवी घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झालाय. यामध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. भटुंबरे गावाजवळ आज पहाटे खासगी बस आण ट्रकचा भीषण अपघात (Devotees bus accident Pandharpur) झालाय. अपघात इतका भीषण होता की खासगी बसचा चुराडा झालाय. प्रवासाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी आहेत. पंढरपूर- टेंभुर्णी महामार्गावर आज पहाटे मालवाहतूक ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. पंढरपूर जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ पहाटे अपघात झाल्याचं समजतेय.
अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिकांनीही तात्काळ धाव घेत मदत केली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने खासगी बसला जोरदार धडक दिली. ट्रकच्या पुढील बाजूचा चुराडा झालाय. बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट