श्री सरस्वती भुवन प्रशाला, रांजणी येथे स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन.🌹*आनंदोत्सव रंगला....

रांजणी-
दिनांक - १०/०१/२०२५.
     श्री सरस्वती भुवन प्रशाला रांजणी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विविध कार्यक्रमातून सामाजिक कौटुंबिक संदेश विद्यार्थ्यांच्या संस्काराची बाजू बनावी असा स्नेहसंमेलनाचा हेतु आहे. उपस्थित मान्यवरांचे लेझीम पथकाने स्वागत करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थिनींनी मा. आमदार डॉ. हिकमत उढाण, गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र जोशी यांचे औक्षण केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सरस्वती भुवन प्रशाला रांजणीचे माजी अध्यक्ष मा. श्री नानासाहेब देशमुख हे होते. उद्घाटक म्हणून घनसावंगी तालुक्याचे आमदार मा.डॉ.श्री हीकमतदादा उढाण हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी मा.श्री रवींद्र जोशी,शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री गौतमभाऊ देशमुख, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री मधुकर बिरहारे, जिल्हा परिषद सदस्य खालेक कुरेशी शालेय समिती सदस्य मा.श्री प्रेमचंद भंडारी,श्री सय्यद शब्बीर हुसेन ,डॉ. सिद्धिविनायक देशपांडे,शाखा सभासद श्री केशवराव काळे,श्री बळवंतराव देशमुख कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आमदार डॉ. श्री हिकमतदादा उढाण व उपस्थित मान्यवरांनी सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन करून केले.कु.आरती घुले व तिच्या सहकारी विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
यावेळी मा.आमदार डॉ.श्री हिकमतदादा उढाण यांचा श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने शालेय समिती अध्यक्ष श्री गौतमभाऊ देशमुख, मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री मधुकर बिरहारे, श्री स.भु. प्रशाला, कुंभार पिंपळगावचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद बोराडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. 
प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र जोशी व स.भु. रांजणीचे माजी शालेय समिती अध्यक्ष श्री नानासाहेब देशमुख यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री मधुकर बिरहारे यांनी केले. तसेच श्री प्रल्हाद बोराडे सर यांनीही मा. गटशिक्षणाधिकारी व श्री नानासाहेब देशमुख यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी नवनिर्वाचित आमदार मा. श्री हिकमतदादा उढाण यांचा परिचय सहशिक्षक श्री विष्णू पाटील यांनी करून दिला. 
कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार मा.डॉ.श्री.हिकमतदादा उढाण यांनी मनोगत व्यक्त करताना श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. स्नेहसंमेलन माझा आवडता विषय असून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे. आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड करावी व करिअर करावे. असे आवाहन त्यांनी केले व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात श्री नानासाहेब देशमुख यांनी कै.पद्मविभूषण बद्रीनारायणजी बारवाले यांची, समाजातील प्रत्येक मुलांनी शिक्षण घ्यावे. अशी इच्छा होती त्यांचे ऋण नेहमी स्मरणात राहील. शिवाय विद्यार्थ्यांची शिक्षणानेच प्रगती होऊ शकते असे म्हणत शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.
 स्नेहसंमेलनात इ.१ ली ते ९ आणि ११वीतील विद्यार्थ्यांचे ५० कार्यक्रम सादर होत आहेत.यात नाटिका,गितगायान,नृत्य, मुकनाट्य, पोवाडे यांचा समावेश आहे.कार्यक्रमात देशभक्तीपर फ्युजन गिताचे सादरीकरण प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यामध्ये इयत्ता ११ आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्यांना श्री गौतम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमासाठी गावातील नागरिक तसेच बहुसंख्येने महिला पालक, आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमासह प्रशालेत शालेय क्रीडा स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण मा.मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा स्पर्धांचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री सच्चिदानंद जहागीरदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.अनुजा मोरे नववीची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा कारेगावकर, कु.दिव्या तोडकर, कु.अनाबिया सय्यद,यशोदा भोसले यांनी केले. तर आभार गायत्री मोरे हिने मानले. परीक्षक म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री रघुनाथ हाडे, श्री रावसाहेब कलवले, श्रीमती उषा जाधव यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे श्री ज्ञानेश्वर वनगुजरे, श्री अतुल हेलसकर, श्री विष्णू पाटील, श्री सचिन भुतेकर, श्री सुरज बळवंत, वरिष्ठ लिपिक श्री डी.डी. दुबे, ग्रंथपाल संतोष जाधव, कनिष्ठ लिपिक श्री गजानन देशमुख, श्री हरिदास सुरडकर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मनीषा बाबरेकर श्रीमती अंजली वायकोस श्रीमती जयश्री काथार यांनी साकारल्या.🌹🙏🏻

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट