पंतप्रधान आवास योजनेंतर्गत निधीत वाढ करण्यात यावी ....
घनसावंगी : तुळजाई न्युज: कृष्णा बरसाले. ९७६५८७९६५६, घनसावंगी तालुक्यातील ग्रामपंचायती मार्फत सद्या बरेच से ड यादी मधील सिरियल नंबर वरून घरकुल चा लाभ मिळावा म्हणून कागदपत्रे आँनलाईन करण्याचे काम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व संगणक चालक करत आहेत. तरी शासनाकडून मिळत असलेल्या अनुदान रक्कमेत घरकुल बांधकाम होत नाही. नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
पंतप्रधान घरकुल योजने लाभार्थ्यांचे दयनीय अवस्था आज महागाईच्या काळात शासनाकडून घरकुला ला मिळत असलेली रक्कम ही अपुरी पडत आहे. आज विटेचे भाव सिमेंटचे भाव व इतर सर्व गोष्टीचे भाव गगनाला भिडले असून शासनाकडून मिळणाऱ्या लाभांमध्ये घरकुल होत नसल्याच्या चर्चा आणि त्यासोबतच मिस्तरीची मजुरी या सर्व बाबींचा विचार करता आज रोजी मिळत असलेल्या रकमेमध्ये घरकुल होत नसल्याच्या चर्चा घरकुल लाभार्थ्याकडून केल्या जात आहे त्यासाठी शासनाने पंतप्रधान घरकुल लाभार्थ्यांना किमान तीन लाख ते साडे तीन लाख रुपये ग्रामीण भागात घरकुलासाठी देण्यात यावे अशी मागणी घरकुल लाभार्थ्याकडून केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा