'मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यामुळे ', लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली...

     


    प्रतिनिधीपुणे : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. अखेरीस लेखी आश्वासन मिळाल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं आहे.

   जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. "या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून अवघ्या महाराष्ट्राला कळलं आहे मनोज जरांगे नावाच्या माणसाचा उपोषणाचा पोपट आज मेला आहे" असं म्हणत हाके यांनी जरांगेंची खिल्ली उडवली.


मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं. अखेरीस आज सहाव्या दिवशी उपोषण सोडलं आहे. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश धस तसेच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते. जरांगेंनी उपोषण सोडताच लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रहार केला आहे.

'गॅझेट वैगेरे असा कोणताही निर्णय देता येत नाही. गॅझेटमध्ये कुणाचे पुरावे सापडले असेल तर आरक्षण देता येत नाही. या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून अवघ्या महाराष्ट्राला कळलं आहे, मनोज जरांगे नावाच्या माणसाचा उपोषणाचा पोपट आज मेला आहे ' असं म्हणत हाकेंनी जरांगेंची खिल्ली उडवली.


तसंच, 'सग्या सोयऱ्याचा अध्यादेश काढणे बेकादेशीर आहे, सग्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू झाला तर ओबीसीचं आरक्षण संपत नाही तर एससी आणि एसटीचं आरक्षण संपून जाईल. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं काही होऊ देणार नाही. ते कोट्यवधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, आम्ही निवडून दिलेले मुख्यमंत्री आहे. ते असा काही निर्णय घेणार नाही, असा ओबीसींना विश्वास आहे' असंही हाके म्हणाले.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट