"मतं दिली म्हणजे मालक नाही झालात", अजित पवारांच्या विधानावर आता भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले..
बारामती : तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. रविवारी बारामती दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यनंतर आता संताप व्यक्त केला जात आहे.
विरोधकांनी या विधानावरून अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली. तर अजित पवार गटातीलच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आता त्यावर भाष्य केले आहे.
रविवारी बारामतीच्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले की, अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का ? अशा शब्दात अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला होता. त्यावर "मतदार राज्याचे मालक", अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया मतदार आपल्या मंत्र्यांचे मालक आहेत की नाही माहीत नाही. पण हे मतदार या राज्याचे मालक आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने त्यांना मालक बनवलं आहे.
दरम्यान, बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही केलेल्या विधानावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. "संजय गायकवाड यांना माजी मुख्यमंत्र्यांनी लगाम लावायला हवा. माझ्या बाबतीतही त्यांनी अशीच काही वक्तव्ये केली होती. एकनाथ शिंदे यांनी त्यांना समजवायला हवं," असं भुजबळ म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा