शेतकऱ्यांच्या विविध समस्या करिता रास्ता रोको करण्याबाबत निवेदन ...



घनसावंगी/  कृष्णा बरसाले (तुळजाई न्यूज) 

          शेतकऱ्यांच्या विविध समस्या करिता रास्ता रोको करण्याबाबत उपरोक्त विषयी अनुसरून कळविण्यात येते की सण 2024 खरीप पिक विमा तसेच अतिवृष्टी अनुदान तसेच ऊस गाळप हंगाम सुरू होऊन देखील अद्याप शेतकऱ्यांना एफ आर पी नुसार बिल मिळाले नाही.

     साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस घेणाऱ्या कारखान्यावर बंदी आणावी क्षमतेपेक्षा अधिक नोंदी घेणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई करावी.

    तसेच 2023 रब्बीपिक फळ विमा घनसावंगी व राणी उंचेगाव मंडळ ज्या पद्धतीने ट्रिगर बसवले आहेत. त्यानुसार विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. तसेच 2022 -23 ओल्या दुष्काळ चे अनुदान अद्याप पर्यंत हजारो शेतकरी बांधवांना मिळाले नाहीत. व बँक ऑफ महाराष्ट्र यांनी खरीप पीक कर्जाची उद्दिष्ट पूर्ण केली नाही.

      पनण महासंघ व नाफेड खरेदी केंद्रावर अंकुश ठेवण्यात यावे आणि शेतकऱ्यांना वेळेत रक्कम देण्यात यावी या विविध प्रश्नाकरिता ऑक्टोबर महिन्यात तहसील कार्यालय घनसावंगी समोर नऊ दिवस आमरण उपोषण करून देखील प्रश्न जशास तसे आहे. त्यामुळे येत्या सोमवारी दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी बारा वाजता बँक ऑफ महाराष्ट्र चौक  येथे सकल शेतकरी बांधव तालुका घनसांगी च्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे.

    तरी प्रशासनाने वेळेची दखल घेऊन शेतकरी बांधवांना न्याय देण्यात यावा. अन्यथा वरील दिनांक च्या दिवशी रास्ता रोको करण्यात येईल व त्या सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी.

या साठी प्रशासनाने दखल  घ्यावी म्हणून आज तहशील दार निवेदन देण्यात आले. 


निवेदक 

सकल शेतकरी बांधव तालुका घनसावंगी.

 गजानन रामनाथ उगले, गजानन देवडकर, शामगिरी, भरत गोरे, भरत बोर्डे, बालासाहेब सपाटे ,रवी हिवाळे, सचिन काजळे, बाळासाहेब धांगडे यादी उपस्तीत होते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट