नंदिनी बिरादार विद्यापीठाची दुहेरी सुवर्णपदकाची मानकरी

उदगीर/  मुळे : उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थिनी बिरादार नंदिनी वसंतराव हिने महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाच्या निकालाचा मानाचा तुरा दुहेरी सुवर्ण पदक घेऊन सर्व दुर रोवलेला आहे.बिरादार नंदिनीने वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये 900 पैकी 830 गुण घेऊन विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला व प्रोफेसर डाॅ. डी.एल.रेड्डी यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुवर्णपदक प्राप्त केले.तर दुहेरी यश संपादन करत असताना तिने सुक्ष्म जीवशास्त्रामध्ये 900 पैकी 830 गुण घेऊन मागील तीन वर्षांत विद्यापीठातून सर्वोच्च गुण घेण्याचे रेकॉर्डही केलेले आहे.त्यासाठी तिला चंद्रशेखर सदाशिव आयथाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुवर्णपदक मिळालेले आहे.एकाच वेळी दोन सुवर्णपदक मिळवून तिने महाविद्यालयाचे नाव सर्व दुर केलेले आहे.तिला या यशासाठी विभाग प्रमुख डाॅ.आर.पी.बिरादार,डाॅ.एन.व्ही.चाटे,डाॅ.डी. वी.पाटील,डाॅ.एम.ऐ.पाटेकर,काशिमपुरे एस.एम.बी.जी.चिखले,जाधव गोविंद,यांनी मार्गदर्शन केले.तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.रामकिशन मांजरे,किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर,सचिव पी.टी.शिंदे,व सर्व कार्यकारिणी सदस्याने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट