तपोवन एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला, रुळांवर उभा होता ट्रक, अन् सुसाट तपोवनच्या लोको पायलटनं.
जालना : जालना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सारवाडी इथं रेल्वे रुळावर एक ट्रक सोडून चालक फरार झाला होता. आणि त्याच वेळेत मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस सुसाट वेगानं येत होती.
या गाडीतील लोको पायलटला हा ट्रक दिसला आणि लोको पायलटने वेळेवर गाडी थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
दुपारी 2 वाजता घडली घटना
परतूर तहसीलमधील सारवाडी येथे घडली ही घटना आज दुपारी 2 वाजता घडली, असे रेल्वे अधिकारी राजेश शिंदे यांनी सांगितले.
रुळांवर ट्रक सोडून चालक फरार
"ट्रक रुळ ओलांडताना रुळांवर थांबला, त्यानंतर त्याचा चालक गाडी सोडून पळून गेला. मुंबई-नांदेड Tapovan Express Loco pilot एम हुसेन यांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी वेळेत गाडी सुरक्षितपणे थांबवली. अर्ध्या तासानंतर ग्रामस्थांच्या मदतीने ट्रक काढून टाकण्यात आला," असे राजेश शिंदे यांनी सांगितले.
रेल्वे संरक्षण दलाने अज्ञात ट्रक चालकावर रेल्वे कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा