राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या याद्या करण्याबाबत...
तुळजाई न्युज - प्रतिनीधी जालना-प्रवीण ससाणे :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या याद्या प्रसिद्ध करून पात्र विद्यार्थ्याच्या खात्यात त्वरित रक्कम जमा करावी.
आम्ही आपणास लक्षात आणून देऊ इच्छितो की जालना शहरातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या याद्या त्वरित प्रसिद्ध कराव्यात व पात्र विद्यार्थ्याच्या खात्यात लवकरात लवकर लाभ जमा करावी.
अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग मराठवाडा आपणास करीत आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेस 15 दिवसांची मुदत वाढवून मिळावी.
दिनांक 13/3/2025 रोजी
असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय जालना यांना देण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा