उदयनराजेंची रायगडावर गर्जना! अमित शहांकडे केल्या 'या' ५ मोठ्या मागण्या; म्हणाले, युगपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना...
ते म्हणाले की, आज आपण लोकशाहीत आहोत. त्याकाळी त्यांनी लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे हा विचार दिला. शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा विचार दिला. सर्व धर्म समभावाचा विचार केला त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आपले आयुष्य रयतेसाठी पणाला लावले असे उदनय राजे म्हणाले.
उदयनराजे म्हणाले की माझ्या चार-पाच प्रमुख मागण्या आहेत. शिवाजी महाराज, मां जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत कायदा करा, त्यांच्या अवमान करणाऱ्याला दहा वर्षे जामीन मिळाला नाही पाहिजे अशा कायदा करा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज तसेच अनेक युगपुरुषांचा शासन मान्य इतिहास प्रकाशित करण्यात यावा जेणेकरुन समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही.
पुढे बोलताना उदनराजे म्हणाले की, . सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सेन्सॉर बोर्डाची स्थापना करावी. म्हणजे एखाद्या कल्पनेतून कादंबरी होते. पण त्याला ऐतिहासिक पुरावे नसतात. त्यामुळे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे एका सेन्सॉर बोर्डाची निर्मिती करावी.
ज्याप्रमाणे रामायण सर्किटची स्थापना झाली. बुद्ध सर्किट झाली. तसेच शिवस्वराज्य सर्किट देखील करावे, कालच रेल्वे मंत्र्यांनी त्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांचं दिल्लीत भव्य स्मारक व्हावे ही शिवभक्तांची मागणी आहे असे उदयनराजे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. तिथे काही तांत्रिक अडचणी असतील. पण महाराष्ट्रात राज्यपालांच्या बंगल्याच्या ठिकाणी ४८ एकर जागा आहे. तिथे स्मारक झालं पाहिजे. स्मारक बनवण्यामागचा हेतू भावी पिढीला यातून विचार घेता येईल. असा असतो असे उदयनराजे म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा