पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र टूर ऑपरेटर्सने मोठा निर्णय घेतला...
तुळजाई न्युज :-
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांनाच लक्ष्य केल्याने जम्मू काश्मीरला जाण्याचं नियोजन करणाऱ्या लोकांनी त्यांच्या टूर रद्द केल्या आहेत.
याकरता ट्रॅव्हल एजंट्सना हॉटेल्स आणि फ्लाईट बुकिंग रद्द करण्यासाठी सातत्याने फोन येत आहेत. मात्र महाराष्ट्र टूर ऑपरेटर्सने बुकींग रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांना बुकिंग्स रद्द करायच्या आहेत त्यांना मदत केली जाणार असून ज्यांना जायचं आहे त्यांच्या बुकिंग्स घेतल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत राजा राणी ट्रॅव्हल्सचे अभिजित पाटील यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये याआधीही असे प्रकार घडले आहेत. अमरनाथ यात्रेवेळीही हल्ला झाला होता. पण हा पहलगाममधील हा पहिल्यांदा टाईम ब्लॅंक हल्ला झाला आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर बदल दिसत आहेत. २०१६ पर्यंत असा हल्ला झाला असता तर कोणी बाहेर आलं नसतं. आजस्थानिकांमध्ये अतिरेक्यांबद्दल प्रचंड रोष आहे पाकिस्तानबद्दल राग आहे. सोशल मीडियामुळे याचा परिणाम झाला आहे. सध्या पीक सिझन सुरु असल्याने महाराष्ट्र टूर ऑपरेटर्सने बुकिंग्स रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे,
दरम्यान पहलगामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील ट्रॅव्हल्स एजंट्सना काश्मीरच्या बुकिंग रद्द करण्यासाठी फोन येत आहेत. ज्या लोकांनी प्रवास करण्याची योजना आखली होती त्यांनीही त्यांचा प्रवासाचा बेत रद्द केला आहे. विमानाने जाणारे काही लोक तिकिटे रद्द करण्यासाठी फोन ककरत आहेत तर काही जण ऑनलाइन रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीतील टूर आशिष शर्मा म्हणाले की पुढील दहा दिवसांसाठी सर्व बुकिंग्स रद्द केल्या आहेत, पुढचा आठवडा चांगला जाणार होता कारण सुमारे ३० टूर आयोजित केल्या होत्या पण या टूर आता रद्द झाल्या आहेत.
विमान तिकीटे, हॉटेलच्या दरात घसरण
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील पर्यटनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रॅव्हल ऑपरेटर्सना बुकिंग रद्द होण्याची भीती वाटते. पर्यटन उद्योगाचे मोठे नुकसान होऊ शकते. हल्ल्यानंतर दिल्ली-श्रीनगर विमान भाडे आणि हॉटेलच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, हॉटेल चालकांना आता बुकिंग रद्द करण्याचे फोन येत आहेत. हॉटेल मालक यामुळे नाराज आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा