मुख्यमंत्री योजनेमधून जलजीवन मिशन अंतर्गत नानेगाव येथे नळ योजना राबविण्यात आली असून त्याची चौकशी व गोरगरिबांना नळ न दिल्याची चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.....

 

   तुळजाई न्युज संपादक जालना - कृष्णा बरसाले : मुख्यमंत्री योजने अंतर्गत जल जीवन मिशन योजना गेल्या चार ते पाच वर्षे पासून लाभ न मिळाल्याने नानेगाव ग्रामपंचायत कडून गावांमध्ये एकाही घरासमोर पिण्याचे पाण्याचे नळ उपलब्ध नसुन व त्याचे काम पूर्ण झाले आणि बिल मंजूरी  आले. याबाबत पाहणी व चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे नागरिकांनी/ महिलांनी भांडी - कळशी घेऊन मोर्चा काढला.


       तरी साहेबांना  विनंतीपूर्व अर्ज सादर करण्यात येत आहे की मौजे नानेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना ग्रामपंचायत कार्यालय गाव मध्ये पिण्याचे पाण्याची टाकीचे काम जिल्हा परिषद कार्यालयामधून मुख्यमंत्री जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चार-पाच वर्षापासून पिण्याचे पाण्यासाठी योजना राबविण्यात आली होती तरी गावामध्ये बांधकाम केले असून त्याचप्रमाणे सर्व गावांमध्ये पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले असून व ग्रामपंचायत कडून गावांमध्ये घराच्या हे काही घरासमोर पिण्याच्या पाण्याचे नळ उपलब्ध करून दिले नाही योजनेचा लाभ घेतला परंतु गावात पाणी नाही त्यामुळे गावातील गोरगरीब नागरिकांना पाहण्यासाठी सतत त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे नानेगाव मधील नागरिक सरकारच्या लाडक्या बहिणीला व नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भटकंती करावी लागते या योजनेचा लाभ घेऊन सुद्धा आजपर्यंत गावात पाण्याची सुविधा उपलब्ध नाही असा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न पडला आहे त्यामुळे अंकुश चव्हाण आणि व समस्त गावकऱ्यांनी आणि महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती बदनापूर यांच्या कार्यालयात दिनांक 27/ 12/ 2024 रोजी तसेच दिनांक 14/ 2 /2029 रोजी पिण्याच्या पाण्यासाठी मागणी अर्ज दाखल केलेला आहे.  त्या अर्जावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही .

त्यामुळे गावासाठी पाण्याची सोय प्रश्न आणि अत्यंत गंभीर अर्ज असून मान्य करून प्रशासनाने तात्काळ पंचायत समिती बदनापूर व ग्रामपंचायत कार्यालय नाणेगाव यांच्या यांना पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची लेखी स्वरुपात आदेश तात्काळ देण्यात यावे न्याय हक्कासाठी निवेदनाची व अर्जाची दखल घेऊन गोरगरीब नागरिकांना पिण्याचे पाण्याचे नळ जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर हर घर जल ही योजना गावासाठी पूर्णपणे राबविण्यात यावी त्याचप्रमाणे वरील दिनांक ची प्रलंबित अर्जाची दखल घेऊन सखोल पाहणी व चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी व गावकऱ्यांना पिण्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावी असे गावकऱ्यांच्या वतीने मंडळ अधिकारी व पाणीपुरवठा विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे.


अंकुश रुस्तम चव्हाण, मारुती गायकवाड, प्रल्हाद माणिकराव कसाब, कृष्णा जालिंदर चव्हाण, दत्ता शामराव भिस्ते, आसाराम राम नागरे, अमोल चव्हाण, गंगाराम गायकवाड, कृष्णा भोळे, संतोष दिवा पवार, अंकुश लक्ष्मण नागरे, नंदाबाई मनोहर कुमकवत, व आदि उपस्थित होते.

 जिल्हाधिकार्यालयावर हंडा कळशी मोर्चा घेऊन निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारताने  निवासी उपजिल्हाधिकारी मा.श्री.गणेश जी महाडिक घेतला व पुढील चौकशी करण्याचे आदेश दिले.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट