जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास कामे आणि नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक .....


जिल्हाधिकारी कार्यालय जालना

 तुळजाई न्युज : जालना प्रतिनिधी - प्रवीण ससाणे : जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास कामे आणि नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जालना जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजनांवर विचारमंथन झाले. या प्रसंगी आमदार हिकमत दादा उढाण उपस्थित होते.

बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा जसे की पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि वीज यासारख्या समस्यांवर तातडीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर समन्वय साधून कामे पूर्ण करण्याचे आवाहन केले.

आमदार हिकमत दादा उढाण यांनीही आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि 
विशेषत "जल जिवन मिशन" व पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. त्यांनी विशेषतः ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला.

या बैठकीत आमदार अर्जुन भाउ खाेतकर ,जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट