राहुल शावल पाखरे psychologist मानसशास्त्र या विषयात मास्टर डिग्री मध्ये शिक्षण घेत असून त्यांनी त्यांचा अनुभव व मार्गदर्शन देणाऱ्या सर्व शिक्षकांचे आभार मानले.....



 मी राहुल शावल पाखरे  अंकुशराव टोपे कॉलेज जालना या महाविद्यालयात शिक्षण घेत असून तेथील विद्यार्थी आहे. व M. A. 2nd Year मानसशास्त्र या विषयात मास्टर डिग्री मध्ये शिक्षण घेत आहे . जेव्हा आम्ही 3 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.25 ला सिव्हिल हॉस्पिटल जालना येथील मानसिक आरोग्य विभाग 33 ( OPD) मध्ये इंटरशिप साठी आलो होतो, तेव्हा सर्व प्रथम डॉ. प्रदीप शिंदे सर यांच्यासोबत 5 मिनिट होतो. नंतर तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र येथे पहिला दिवस होता, तेथील सरानी आम्हाला स्मोकिंग आणि ड्रिंकिंग यामध्ये अल्कोहोल व निकोटिन हे घातक पदार्थ असतात. व त्याची हळूहळू बॉडीला सवय लागते. व नंतर त्याशिवाय बेचैन होणे उदासीन वाटणे, व झोप न येणे हे त्यातल्या अल्कोहोल आणि निकोटिन द्वारे होते हे समजावले. दुसरा दिवस क्लिनिकल psychologist गजानन खरात सर यांचासोबत मानसिक आरोग्याबद्दल सांगितले व आम्हाला सर्व केस हिस्टरी बद्दल बेसिक माहिती दिली व काही टेस्टिंग चाचण्या दाखवल्या. व चाचण्यांची सर्व माहिती सांगितली, व त्यानंतर आमचे इंटरशिप चे सर्व विद्यार्थी येऊ लागले, व आमचे गुरू तसेच *मार्गदर्शक psychologist* *प्रदीप शिंदे सर, यांचा* *मार्गदर्शनाने आमची intership रेग्युलर चालू* झाली. व सरांनी आम्हाला सर्वप्रथम केस हिस्टरी म्हणजे काय हे सुटसुटीक समजून सांगितले. व पूर्ण केस हिस्टरी पॉईंट टू पॉईंट समजून सांगितली.. व ओपीडी द्वारे, कौन्सिलिंग कशी करायची सुरुवातीला काय काय माहिती विचारायची client ची वैयक्तिक माहिती कशा पद्धतीने घ्यायची. व client ला इजा होणार नाही, client Depression मध्ये जाणार नाही, 
व client घाबरणार नाही. व सर्व खरे खरे सांगेल अशा पद्धतीने त्याला माहिती विचारायची. व client ची कौन्सिलिंग प्रक्रिया चांगली करणे. व client ओपीडी मधून बाहेर गेला की खूप फ्रेश आणि आनंदित जायचा. आमचा इंटरशिप जीवनाचे वर्णन १८० तास नव्हे तर १८० दिवस होते असे असल्यासारखे वाटले, सरांनी जीवन' असे केले होते. की आपली संकटे, डिप्रेशन दुःख ही सर्व बाजूला ठेवून जीवन म्हणजे 'मज्जाच मज्जा' आहे असे करून टाकले. तसेच जीवनातील प्रत्येक क्षण हा हसत खेळत कसा जगायचा. व जीवनामध्ये शिस्तपणा, आणि वेळेचे नियोजन कसे करायचे, व सर्व कामे वेळेवर पूर्ण करणे, कामे वेळेवर पूर्ण केले की ताण येणार नाही, व चिंता वाटणार नाही.

व आमच्या इंटरशिप च्या विद्यार्थीचे तसेच स्वतःच्या व इतरांच्या जीवनाच चित्र आनंदमय होत गेलं. पण मला तरी तसा अनुभव आला नाही. की इंटरशिप मध्ये मात्र फार मोठे दडपण होते. आमच्या इंटरशिप चे वातावरण अगदी वेगळे होते. त्यामुळे त्या सरांची आणि आमची नाती कधी घट्ट झाली, आम्हाला कळलेच नाही, आमचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. इंटरशिप सारखा जिव्हाळा मला कुठेच मिळाला नाही. माझ्या सोबतचे सर्वच विद्यार्थी एका जीवा भावाचे होते. व आमचे भाऊ बहिणीचे नाती असल्यासारखे होते, आमचा गट सर्व एक दुसऱ्याला खूप मदत करत होता, एकमेकांचे दुःख सर्वजण वाटून घेत होते, पण ते बहुधा अभ्यासेतर गोष्ठी साठीच गप्पा करत असायचे. बरीचशी मुले आपला वेळ कॅन्टीन मध्ये घालतात. पण आमचा तो ओपीडी मधील डॉ. प्रदीप शिंदे सरांसोबत बसलेल्यातच आणि स्टडी करण्यात आम्ही तिथेच गप्पा मारायचो जो तिथे आनंद होता. तो कशातच भासला नाही.

 इंटरशिप चालू होती त्यादरम्यान सरांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले त्यांनी आम्हाला वेगवेगळे मानसिक आजार जसे की सिझोफेनिया, मूड डिसऑर्डर, एनजायटी, दिसऑर्डर, एडिक्शन, इंटेल डिसॅबिलिटी, बायपोलर अशा विविध रुग्णाविषयी माहिती देऊन प्रत्यक्ष रुग्णांचे कॉन्सिलिंग कसे करावे तसेच केस टेकिंग केस हिस्ट्री कशी घ्यावी हेही शिकवले तसेच मानसिक आरोग्याची निगडित घेण्यात येणाऱ्या विविध चाचण्याविषयी मार्गदर्शन केले तसेच इंटरशिप नंतर सर्टिफिकेट देऊन आम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या... व आमचे सत्कार देखील करण्यात आले. 
एवढेच नव्हे तर आम्हाला मानसशास्त्राच्या निगडीत सर्व माहिती दिली, व करिअर विषयी खूप मार्गदर्शन केले. आम्हाला
जिल्हा हॉस्पिटल जालना येथील मानसिक आरोग्य विभाग जालना येथील सर्व सायकॉलॉजीस्ट. आणि डॉ. सायकियाट्रिक या सर्वांची ओळख करून दिली. 
मानसिक आरोग्य विभाग जालना जिल्हा हॉस्पिटल 
डॉ. जिल्हा चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील सर .
सिव्हिल एडिसनल डॉ. राजेंद्र गाडेकर सर.
HOD CLASS 1) डॉ. नितीन पवार सर.
सायकियाट्रिक डॉ. शहा सर सायकियाट्रिक डॉ. बजाज सर
सायकियाट्रिक डॉ. वैशाली मॅडम 
डॉ. सेठीया सर. 
सायकॉलॉजीस्ट प्रदीप शिंदे सर आमचे आदर्श गुरु. 
अंकित सर.
किशोर काकडे सर.
गजानन खरात सर.
रामेश्वर सर.
सुलोचना पडोल मॅम.
शीतल मॅम.
प्रतिभा मॅम. 
पाईकराव मॅम.
सीमा मॅम.
जया मॅम.
किरण मॅम.
मानसिक आरोग्य विभाग जालना
डिपार्टमेंट. 
डे केअर.
सायकॉलॉजीस्ट. 
सायकियाट्रिक. 
कोणी राहील असेल, किंवा कोणाचे नाव राहिले किंवा चुकले असेल तर क्षमा असावी... 
तुम्हा सर्वांचे मॅनेजमेंट हे खूप चांगले होते. सर्व प्रामाणिक पणे कामे करतात. व सर्वांचा स्वभाव खूप छान आहे. 
 *राहुल शावल पाखरे.* 
 *मु* *, पोस्ट, रेवगाव. ता. जि. जालना.* 
 
अशाच अजुन माहिती साठी व बातम्या साठी तुळजाई न्युज ला  संपर्क करा.  मो. 9765879656

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट