बारामतीत कालवा फुटला, भयानक पाऊस पाण्याचा प्रचंड वेग.....,


तुळजाई न्युज : महाराष्ट्रात पाऊसाने धुमशान घातला आहे, मे महिन्यातच राज्यभरात तुफान पाऊस पडत आहे. पुण्या जिल्हासह सर्व महाराष्ट्राला पाऊसाने झोडपून काढले आहे.

अशातच बारमतीत भयानक पाऊस झाला आहे. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे बारामतीचा नीरा डावा कालवा फुटला आहे.

बारामती तालुक्यातील निरा डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फूटला आहे. कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. कालव्याचे पाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आले आहे. हा महामार्ग जलमय झाला आहे. खरबदारी म्हणून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी निरा डावा कालवा आहे. कालवा फुटून कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घरामध्ये घुसून मोठे नुकसान झाले आहे. काटेवाडी भवानीनगर हा रस्ता तूर्तास बंद करण्यात आला आहे.

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील ओढ्याला पूर आलेला आहे. या पुराचे पाणी सणसर गावातील अनेकांच्या घरात शिरलेल आहे. अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचं यामध्ये मोठ नुकसान झालंय. सणसर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ओढा तुडुंब भरून वाहतोय तर पुणे बारामती मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झालीय.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 5 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साचतय. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तर अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेत.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट