पाकचं शेपूट वाकडंच! तीन तासाच युद्धविराम तोडला; जम्मूत गोळीबार, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज...

    

  तुळजाई न्युज : आताची सर्वात मोठी बातमी, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली होती. टिपेला पोहोचलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असे म्हटले जात होते. पण पाकिस्तानने पुन्हा भ्याडपणे भारतावर हल्ला केला आहे.
पाकिस्तानने अवघ्या ३ तासांमध्येच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या गोळीबाराला बीएसएफने चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आला आहे.

तर श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज आले होते. ७ ते ८ स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ५.३० वाजता युद्धविराम घेतला होता, ८ वाजता पाकिस्तानने युद्धविराम तोडला.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट