अहमदाबाद विमान अपघातात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू? प्लेन थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले! विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह खासदार सुनील तटकरेंच्या भाचे सुनेचाही 240 प्रवाशी मृत्यू.....
तुळजाई न्युज : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. जमिनीवर आदळल्यानंतर या विमानाच्या अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या आहेत. हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आहे.
दरम्यान, या विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान ज्या इमारतीवर आदळले ते विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघातात तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले (Ahmedabad Plane Crash ) असून या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी ( Vijay Rupani) यांच्यासह 242 लोक होते.
वसतीगृहाच्या इमारतीवर विमान कोसळलं
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे B-787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र टेक ऑफनंतर अवघ्या दहा मिनिटांत या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान एका इमारतीवर आदळले आहे. मेघानी नगरात हे विमान कोसळलं आहे. याच भागात बीजे वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील वसतीगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळले आहे. या वसतीगृहाच्या वर भोजनालय आहे. याच ठिकाणी विद्यार्थी दुपारचे जेवण करायला जतात. विमान थेट वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळल्यामुळे या अपघातात प्रवाशांसोबतच तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
विमानाचा मागचा भाग वसतीगृहावर लटकला
हे विमान कोसळल्यानंतर थेट बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाच्या इमारतीवर आदळलं आहे. या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. समोर आलेल्या या फोटोंमध्ये विमानाचा मागील भाग वसतीगृहाच्या इमातीवर लटकत असल्याचे दिसत आहे. तसेच विमानाच्या समोरचा भाग पूर्णपणे जळून गेला आहे.
विमानात 11 लहान मुलं तसेच 2 छोटे बाळ
सध्यातरी एनडीआएफ, पोलीस, पालिका प्रशासन हे युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे. त्यामुळे विमान कोसळल्यानंतर नेमकी जीवितहानी किती झाली आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, या विमानात एकूण 11 लहान मुलं तसेच 2 छोटे बाळही होते. या विमाात भारतीय तसेच परदेशी नागरिकही होते.
विमान अपघातात सुनील तटकरेंच्या भाचे सुनेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. अपर्णा महाडिक असे तटकरे यांच्या भाचे सुनेचे नाव असून, त्या एअर इंडिया अपघाग्रस्त विमानात क्रू मेंबर म्हणून उपस्थित होत्या.
अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या सख्या भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या आणि दुपारीची फ्लाईट होती. अपर्णा यांचे पती सुद्धा एअर इंडीयामध्ये आहेत.
Video : BJ मेडिकल कॉलेजवर कोसळलं विमान; जेवतानाचं विद्यार्थांवर काळाचा घाला, अनेकांचा मृत्यू
विमानातील क्रू मेंबर्सची नावे खालीलप्रमाणे
क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर
सुमित सबरवाल
अपर्णा महाडिक
श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1
दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2
इरफान शेख
नंथेम सिंगसेन
मैथिली पाटील
मनीषा थापा
What Is Mayday Call: अहमदाबादमध्ये विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने कोणाला फोन केला होता?
उड्डाणानंतर दहा मिनिटात अपघात
याच विमानामध्ये क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचे सून असून या देखील याच विमानात होत्या अशी माहिती समोर येत आहे. एअर इंडियाचं हे विमान उडान घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच रहिवाशी परिसरात कोसळल्याने अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. शिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील प्रवास करत होते. गुजरात मधील राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री रूपानी यांचा देखील मृत्यू झाला असं ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र त्यांनी काही वेळाने ट्विट डिलीट केलं. Ahmedabad Plane Crash
एअर इंडियाचे विमान कसं कोसळले?
फ्लाइट एआय 171 अहमदाबादहून लंडनला जात होती. अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर कोसळलं. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जातंय.
विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू
दरम्यान, अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा असोसिएटेड प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. अपघातग्रस्त विमानात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बोईंग ७८७-८ ने दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले. त्यात २४२ प्रवासी होते, त्यापैकी १२ क्रू मेंबर्स होते, उर्वरित २३० प्रवाशांपैकी बहुतेक १६९ भारतीय होते. ५३ ब्रिटिश नागरिक होते, १ प्रवासी कॅनडाचा होता आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा