पत्नीवर अनैतिक संबंधाचे आरोप, तिच्या कुटुंबाकडून छळ; तलाठ्यानं तरुणीसोबत का उचललं टोकाचं पाऊल? चिठ्ठीत खुलासा.....
तुळजाई न्युज : पुण्यातील जुन्नर तालुक्यात कोकणकड्याच्या दरीत एका तलाठ्यासह कॉलेज तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. श्रीगोंद्यातील तलाठ्याचं नाव रामचंद्र पारधी असं आहे. त्यांचा मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळून आलाय.
त्यांची कार दुर्गावाडी इथल्या कोकणकडा परिसरात आढळलीय. तर रामचंद्र यांच्यासह तरुणीच्या चपला तिथेच सापडल्या.पत्नीवर अनैतिक संबंधाचे आरोप, तिच्या कुटुंबाकडून छळ; तलाठ्यानं तरुणीसोबत का उचललं टोकाचं पाऊल?
तलाठी रामचंद्र पारधी यांचं वय ४० असून मुलीचं वय १७ वर्षे इतकं असल्याचं समजते. रामचंद्र हे श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. तर तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. दोघांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या हाती सुसाइड नोटही लागली आहे.
रामचंद्र पारधी यांनी सुसाइड नोटमध्ये त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच पत्नीबाबतही धक्कादायक बाबी लिहिल्या आहेत. पत्नी, तिच्या चुलत बहिणी आणि त्यांच्या पतीकडून त्रास दिला जात असल्याचं सुसाइड नोटमध्ये म्हटलंय.
पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळलो आहे. यामुळे जगण्याची इच्छा नाही असं रामचंद्र पारधी यांनी म्हटलं. पत्नीची लायकी नाहीय. ती घरातल्या सगळ्या गोष्टी फोन करून आणि भेटलेल्यांना सांगते. नवरा किती वाईट, ती कशी चांगली हेच नातेवाईकांना सांगते. नातेवाईकांमध्ये माझी बदनामी केलीय. आठ वर्षे हे सगळं मी सहन केलं असं रामचंद्र पारधी यांनी म्हटलंय.
रामचंद्र पारधी यांनी अनेक गंभीर आरोप पत्नीवर केलेत. पत्नीचे गावातल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिनं कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही असा आरोप सुसाइड नोटमध्ये केलाय. पत्नीसह तिच्या नातेवाईकांना बदनामी केल्यानं जगण्याची इच्छा नाही. माझ्या मृत्यूला त्या सर्वांना जबाबदार धरा आणि कारवाई करा असं म्हणताना रामचंद्र पारधी यांनी आई-वडील, बहीण-भाऊ आणि मुलांची माफी मागितलीय.
गेल्या काही दिवसांपासून रामचंद्र पारधी आणि कॉलेज तरुणी बेपत्ता होती. रामचंद्र पारधी यांच्या पत्नीने पोलिसात पती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. तेव्हापासून रामचंद्र यांचा शोध घेतला जात होता. रविवारी त्यांची गाडी जुन्नरमधील रिव्हर्स वॉटर फॉलजवळ आढळून आली. तर कड्यावर पुरूष आणि स्त्रीचे चप्पल होते. दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जात होता. सोमवारी सायंकाळी उशिरा दोघांचेही मृतदेह आढळले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा