"तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही", भाजपा आमदार लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य...
तुळजाई न्युज परतूर : भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर हे एका गावातील टीकाकारांवर बोलत असताना घसरल्याचं पाहायला मिळालं. "तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले", अशी भाषा लोणीकर बोलत होते.
"तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आहेत ते आम्हीच दिलेत.
बबनराव लोणीकर म्हणाले, "ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो मोबाइल देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?
बबनराव लोणीकर नेमकं काय म्हणाले होते?
"सोशल मीडियावर चार-पाच कार्टी असतात, त्यांचा मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरने केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 हजार रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या आई, बहीण आणि पत्नीला लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आणि तुझ्या पायावरची चप्पल आमच्यामुळेच. हातातलं ते मोबाईलचं डबडं आमच्यामुळे आणि आमचंच घेतो आणि आमच्यावरच तंगड्या वर करतो", असं वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलं.
वादग्रस्त वक्तव्यावर लोणीकर काय म्हणाले?
या वादग्रस्त वक्तव्यानंतर बबनराव लोणीकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. "काही राजकीय पक्षांचं 10 लोकांचं टोळकं आहे. हे टोळकं महिन्याने लावलेलं आहे. पैसे देऊन लावलेले आहे. या टोळक्यातील लोकं केंद्र सरकारला टार्गेट करतात. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला टार्गेट करतात. मला टार्गेट करतात. ट्रोल करतात. ते ट्रोल करत असताना त्यांच्या कुटुंबामध्ये मी राजकारण केलं नाही. त्यांची आई आहेत, त्यांचे वडील आहेत. त्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो", असं बबनराव लोणीकर म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा