बच्चु कडु यांचे अंन्नत्याग आंदोलन सुरू, आमदार रोहित पवार यांचा पाठिंबा...
तुळजाई न्युज अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चु भाऊ कडु यांनी गुरुकुंज मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मोझरी येथे दाखल होत असुन मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बच्चु भाऊ कडु यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, लोकांच्या डोक्यात हिदू-मुस्लीम द्वेष पेरला जात आहे. मी बलिदान द्यायला तयार आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
आमच्या जीवन मरणाचा प्रश्न…
अन्नत्याग आंदोलनाला बसलेले असताना बच्चू कडू यांनी भाषम केले. यावेळी बोलताना देशातील शेतकरी नेते राकेश टिकेत उद्या इथे येणार आहेत. देशात आता जातीय रंग देण्याचा काम केलं जातंय. राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटवला गेला. त्यामुळे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न मागे पडत चालला आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.
आमच्या डोक्यात हिंदू-मुस्लीम द्वेष टाकला जात आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणजे बच्चू कडू यांचे आंदोलन आहे. बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहला पाहिजे ही व्यवस्था मोडून काढायची आहे. आमच्या बियाण्याचे भाव का कमी झाले नाही, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
शेतकऱ्यांच्या मालाचा भाव…
तसेच मत विकायला लाडकी बहीण सुरू केली. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले आहेत. सरकार सत्तेवर यावे यासाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. त्याच काळात मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडला होता. सरकारला माहीत आहे की बच्चू कडू मेला तरी फ़रक पडत नाही. कारण त्यांनी जाती धर्मात लोकांना गुंतवणूक ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
कडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन
दरम्यान, आजपासून बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन चालू झाले आहे. शेतकरी, अपंग, शिक्षक, दिव्यांग, शेतमजूर, मच्छिमार यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी ते या आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाची सरकार कशी दखल घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे.
मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळाजवळ आंदोलनाला सुरुवात झाली. अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते मोझरीपर्यंत बाईक फेरी काढण्यात आली. या फेरीत शेकडो समर्थक सहभागी झाले होते.
राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यासह अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला जाणार होता. परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन बरेच महिने उलटूनही सरकारकडून या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. म्हणून अन्नत्याग आंदोलन सुरू करीत आहोत, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विमा संरक्षण मिळावे, शेतमजुरांचे आर्थिक हित जपण्याकरिता स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी, लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेतीकामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा. हे शक्य नसल्यास तेलंगणाच्या धर्तीवर एकरी १० हजार रुपयांची मदत देण्यात यावी. रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खतालादेखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी, दुधातील भेसळ रोखत गाईच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीसाठी ६० रुपये प्रतिलिटर असा दर निश्चित करावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरिता ४० रुपये दर होईस्तोवर निर्यात बंदी लागू करू नये, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
दिव्यांगाना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही, अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होत आहेत. सरकार जाणीवपूर्वक मुद्द्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत आहे. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. माझी अंत्ययात्रा निघाली, तरी आम्ही आमच्या मुद्यांपासून दूर होणार नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा