रोटरी क्लब ऑफ जालना रेनबो तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी रोटी रेनबो टॅलेंट हंट स्पर्धा....


तुळजाई न्युज : रोटरी रेनबो टॅलेंट हंट क्युज स्पर्धा
 रोटरी क्लब ऑफ जालना रेनबो तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी रोटी रेनबो टॅलेंट हंट स्पर्धा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये घेण्यात आली.

    सहप्रायोजक जय हिंद अकॅडमी होते विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमाव्यतिरिक्त इतर माहिती सुद्धा असणे आवश्यक आहे. यासाठी सामान्य ज्ञान, समाजकारण, राजकारण, पर्यावरण या सर्व बाबींना समोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी पाच फेऱ्या घेण्यात आल्या फेरीमध्ये जे विजेता ठरले पारितोषिक देण्याचे ठरले या स्पर्धेमध्ये श्री महावीर स्थानक वासी जैन मराठी विद्यालय, श्री जैन इंग्रजी विद्यालय,  आर. एच. व्ही. इंग्रजी राष्ट्रीय हिंदी विद्यालय, मराठी माध्यम राष्ट्रीय हिंदी विद्यालय, इंग्रजी माध्यम सरस्वती भुवन प्रशाला सी. टी. एम. के. गुजराती विद्यालय, सेंट मेरी हायस्कूल, एम.आर.डी.ए विद्यालय, कृषी विद्या स्कूल नवयुवक विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दानकुवर हिंदी कन्या विद्यालय असे एकूण बारा विद्यालयाचा सहभाग होता यावेळी विजयी स्पर्धक आणि त्यांची पारितोषिके पुढीलप्रमाणे देण्यात आली. 
 प्रथम पारितोषिक ऋषी विद्यालय
2100/- रोख रक्कम विद्यार्थ्यांसाठी मेडल व शाळेसाठी ढाल 
 द्वितीय पारितोषिक एम आर डी ए स्कूल 
1500/- रोख पारितोषिक विद्यार्थ्यांसाठी मेडल शाळेसाठी ढाल
 तृतीय पारितोषिक 
 श्री महाथा जैन इंग्रजी माध्यमिक विद्यालय 
1000/- रोख पारितोषिक विद्यार्थ्यांसाठी मेडल आणि शाळेसाठी ढाल 
असे पारितोषिकाचे स्वरूप होते सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या सर्व पारितोषिकाचे प्रायोजक जय हिंद अकॅडमी होती.
      यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर प्रतिभा श्रीपत सचिव, श्री पंकज लढा, डॉक्टर नितीन खंडेलवाल, श्री विवेकमणियार, श्री रमेश लखोटिया, डॉक्टर भाग्यवान पोद्दार विद्यालयाचे प्राचार्य श्री डेविड सर  यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख म्हणून सौ. नेहा पाटणी, सौ. कल्पना मुंदडा यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राजश्री भक्कड यांनी केले

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....