श्री महावीर स्थानकवाशी जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा....



 तुळजाई न्युज :   जालना येथील श्री महावीर स्थानकवाशी जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना येथे  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात  आला.

        या प्रसंगी प्रमुख अतिथी  म्हणून श्री  वर्धमान  स्थानकवाशी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश कुमारजी सकलेचा, महामंत्री डॉ. धरमचंदजी गादीया, उपाध्यक्ष श्री. भरतकुमारजी गादिया, सहसचिव मा.श्री.  कचरूलालजी कुंकूलोळ,  श्रावक संघाचे डॉ. गौतमचंदजी रुगवाल, श्री. संजयकुमारजी बंब,  शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. जितेशकुमारजी भायाणी, उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी भंडारी, कोषाध्यक्ष श्री. विजयकुमारजी नहार. सदस्य श्री. गिरीषकुमार बाफना, समाजातील आकाश बोथरा, विकी अलीजार, रोहित बरलोटा, अजय बोरा,  गौतम संचेती, राहुल बोरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

         श्री. महावीर स्थानकवाशी जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याचे अध्यक्ष मा.श्री. जितेशकुमारजी भायानी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात श्रावक संघाचे अध्यक्ष मा. श्री. सुरेशकुमारजी सकलेचा यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  विद्यालयाच्या माजी विद्यार्थी श्री. अमोल होलानी यांनी त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यालयास एक स्मार्ट बोर्ड भेट दिले.

     स्वातंत्र्य दिना निमित्त विद्यालयात एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांची पथ संचलन  केले. या पथ संचालनात रकाउड, गाईड चे हि विद्यार्थी सहभागी होते.  शाळेच्या विद्यार्थ्यांनी  कवायत तसेच समूह नृत्य,  गीत गायन,  असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 


       यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, व विविध स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यालयातर्फे प्रशस्ती पत्र, स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

     या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एम. वानगोता, उपमुख्यध्यापिका श्रीमती डॉ. पी. के. श्रीपत,  पर्यवेक्षक श्री. डी. एस. शिंदे,  सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. आर. देशपांडे यांनी केले,  तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका  श्रीमती. सोमानी यांनी केले.

सर्वाना ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!


तुळजाई न्युज  मुख्यसंपादक - कृष्णा मच्छिंद्र बरसाले

९७६५८७९६५६

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....