तळेगाव येथील ग्रामसेवक लाच घेतान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.....
तुळजाई न्युज :प्रतिनिधी प्रवीण ससाणे : तळेगाव येथील रोजगार हमी योजने अंतर्गत पांदन रस्त्याच्या केलेल्या कामाचे बिलाची चेक देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विजय मोतीलाल शिंदे ( वय ५०) पन्नास हजार रुपयाची लाच मागणी केली. त्यापैकी २५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.
25 पहिला हप्ता 25 हजार यावर यावेळी यातील तक्रारदार यांनी तळेगाव ग्रामपंचायत येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधन रस्त्याच्या केलेल्या कामाची एकूण बिल ११ लाख ४० हजार रुपये तळेगाव ग्रामपंचायतच्या खात्यात जमा झाले होते. नमूद बिलाचा चेक देणे साठी ग्रामविकास अधिकारी विजय मोतीलाल शिंदे पन्नास हजार रुपयाची लाच मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभाग जालना यांच्याकडे तक्रार केली असता गुरुवारी ता.२१ रोजी १२:१० वाजता सुमारास लक्ष्मी अँड राखी चाट भंडार समोर जालना ते अंबड रोड अंबड चौफुली जिल्हा जालना येथे सापळा कारवाई दरम्यान त्यांच्या पक्ष तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपयाची लाज स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जालनाची पोलीस निरीक्षक शरद चंद्र रोडगे यांनी व त्यांचे पथकाने ताब्यात घेतले व अंग जडती घेतली असता लाच घेतलेली रक्कम पंचवीस हजार रुपये व इतर 9250 रुपये असे एकूण 34 हजार 250 रुपये व ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळून आला.
विजय मोतीलाल शिंदे ग्रामविकास अधिकारी तळेगाव जिल्हा घर क्रमांक 37 पांगर घर नगर अंबड चौफुली जालना मूळ राहणार वडगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांच्यावर पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील सदरची कारवाही श्रीमती माधुरी केदार कांगणे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर श्री शशिकांत शिंनगारे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेक्षण अधिकारी तथा सहाय्यक सापळा अधिकारी श्री.बी.एस.जाधवर, सापळाअधिकारी पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे व पथकातील पोलीस अंमलदार पोहे का गजानन खरात, आतिश तिडके, पोलीस अंमलदार गजानन कांबळे, अमोल चेके, मनोहर भुतेकर लाचलुजपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी केली.
प्रतिबंधक विभाग जालना यांचे कडून आव्हान करण्यात येते की कोणी लोकसेवक स्वतः आगर इतर मार्फत शासकीय कामाची लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्तीमार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 024 82 22 0 252 टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करा तसेच पोलीस उपअधीक्षक जालना.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा