लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार; आदिती तटकरेंची घोषणा...
येत्या ३-४ दिवसांत सर्व महिलांना मिळणार १५०० रुपये
लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांना पडला होता. त्यानंतर आता हे पैसे आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. येत्या ३-४ दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहे.
आदिती तटकरेंची माहिती
सप्टेंबर महिना सुरु होऊन १० दिवस उलटून गेले तरीही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नव्हती. त्यामुळे महिला चिंतेत होत्या. मात्र, आता हे पैसे आजपासून जमा केले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. याआधीही त्यांनी एकदा सांगितले होते की, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकर दिला जाईल. त्यानंतर आज हे पैसे दिले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेसाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून आजपासून हे पैसे महिलांना दिले जाणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा