बालदिनाचे औचित्य साधून काळेवाडी रहाटणी येथे रविवार दि १६ नोव्हेंबर २०२५“कला क्रीडा पर्यावरण व संस्कृती संवर्धन मंच” च्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन....

तुळजाई न्युज/ प्रतिनिधी - संदीप दुसाने
बालदिनाचे औचित्य साधून रविवार दि १६ नोव्हेंबर २०२५“कला क्रीडा  पर्यावरण व संस्कृती संवर्धन मंच” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वय वर्ष १३ ते १८ वयोगटतील बालकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले होते. यामध्ये काळेवाडी रहाटणी परिसरातील १६ संघाचा सहभाग लाभला. त्यामध्ये प्रथम पारितोषिक माऊली या संघाने मिळवले, द्वितीय क्रमांक शिवरत्न मित्र मंडळ, तृतीय भारतमाता संघ तर चौथा क्रमांक कालभैरव आणि पाचवा क्रमांक वक्रतुंड या संघाने मिळवला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री आशिष पवार, श्री विशाल हजारे, श्री विलोक तावडे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री सुनील सोनवणे, श्री महेश भोरे , श्री तुषार वानी यांनी करून स्पर्धेची शोभा वाढवली. 
अतिशय अटीतटीच्या  झालेल्या सामन्यात विजयी संघाला सन्मानचिन्ह श्री भूषनजी सोंजे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेदरम्यान श्री सोमनाथ गोडांबे, श्री मनोज नवसारे,श्री राहुल नेरकर, मोहित चंदनमाते, युवराज भट, आयुष पाठक, अवधूत भोसले, वेदांत मालगे, शुभम मिस्तरी, निलेश चोपडे, निनाद सिनकर श्री राजेंद्र शेंडगे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या स्पर्धेत समाजातील सर्व मान्यवर उपस्थिती लाभली. लहान मुलांसाठी घेण्यात आलेला उपक्रमामुळे काळेवाडी रहाटणी परिसरातील नागरिकांमधे उत्साहाचे वातावरण झाले आहे. 

या सर्व स्पर्धेचे आयोजक श्री सुहास भुतेकर व श्री क्षितिज घाडगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. भविष्यात असेच विविध उपक्रम घेण्याचं आश्वासन दिले. तरूणामध्ये खिलाडी वृत्ती निर्माण झाली पाहिजे त्याना एक योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे अशी आशा व्यक्त केली. अतिशय खेळीमीच्या आणि उत्साहाच्या वातावरनात सामन्याची सांगता झाली.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट