मकरसंक्रांतीची मोठी भेट! लाडकीच्या खात्यात एकत्रित जमा होणार 3 हजार; बड्या नेत्याची घोषणा....

तुळजाई न्युज -
    विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेतून लाभार्थी महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील प्रचारात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुद्दा गाजला. त्यानंतर आता राज्यातील २९ महापालिका निवडणुकीतही या योजनेवर सातत्याने महायुतीमधील नेत्यांकडून बोलले जात आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांसाना दोन महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार होता. परंतु फक्त १५०० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले. त्यामुळे त्यांची निराश झाली. आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिलांच्या बँक खात्यावर एकत्र ३ हजार रुपये जमा होणार आहेत. याबाबतची घोषणा भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार.. मकर संक्रांतीची मोठी भेट ! १४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे ३००० रुपये जमा होणार ! असे ट्वीट करत मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. याचसोबत एक पोस्टरदेखील शेअर केले आहे. ज्यामध्ये देवाभाऊंकडून लाडक्या बहि‍णींना मकर संक्रांतीची मोठी भेट, असे लिहिले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

येत्या १५ जानेवारीला राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक भाजपसाठी महत्वाची असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. महपालिका निवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसली आहे. फडणवीस राज्यातील विविध भागात जात असून, सभा घेत आहे. त्यांचे होमग्राऊंड असलेल्या नागपूर दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठं विधान केले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"जो पर्यंत देवा भाऊ आहे तो पर्यंत लाडकी योजना बंद होणार नाही. ती कोणी बंद करणार नाही. लाडकी बहिणींना आम्ही आता लखपती दीदी करणार आहोत."

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....