आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघी धानोरा सर्कल मधील कोठा जनसंवाद दौरा...

तुळजाई न्युज परभणी जिल्हा प्रतिनिधी - जनार्दन गायकवाड-
 कोठा जनसंवाद दौरा 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघी धानोरा सर्कल मधील “कोठा” गावात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी घेत नागरिकांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार म्हणून मी प्रचार केला.

या प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आजवर राबवलेल्या लोककल्याणकारी योजना, विकासात्मक उपक्रम आणि त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना झालेला लाभ याची सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात प्रत्येक गावातील समस्यांवर योग्य ते उपाय करण्यात येतील असे आश्वासन दिले.

सोबत भाजपा जिल्हा सचिव श्री सुधाकर जाधव, भाजपा जेष्ट नेते श्री गजानन चव्हाण ,मा सरपंच श्री सुदाम(अंकल) गायकवाड वाघी , मा उपसरपंच श्री सोपान राठोड वाघी व कोठा येथील मित्र परिवार.

सर्कल मधील स्थानिक समस्या, नागरिकांच्या अडचणी व गरजा प्रत्यक्ष अनुभवणारा आणि त्यावर तत्काळ, प्रभावी व दीर्घकालीन उपाययोजना करणारा लोकप्रतिनिधी आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवत ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....