नानेगांव सुकणा नदीच्या तिरावर महाशिवरात्रीचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
तुळजाई न्युज जालना :
नानेगांव सुकणा नदीच्या तिरावर महाशिवरात्रीचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा.... बदनापूर तालुक्यातील नानेगाव नगरी मध्ये
आज दि.15.02.2026 पासून सात दिवस दर वर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला आहे नानेगांव मध्ये शुकना नदीच्या तीरावर भगवान शंकराचे जागृत देवस्थान मंदिर आहे.. हे मराठवाड्यातील एक पुरातन आणि पवित्र शिव शंकराचे स्थान आहे मंदिरातील महादेवाची पिंड आहे येथे नित्यानेयमाने महादेवाची पूजा आणि अभिषेक केल्या जातो वर्षभर दर सोमवारी भाविका कडून महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो.या काळात हजारो भाविक भक्तात येथे भक्ती भावनांने दर्शनासाठी येतात.
अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज. ज्ञानेश्वरी. पारायण.व श्रीमद् भागवत कथा. हरिपाठ. त्यानंतर सायंकाळी 9 ते 11 पर्यंत किर्तन होते.
पहिले कीर्तनाची सेवा ह.भ.प. श्री. पंकज महाराज एकतुनीकर.
2 शितलताई भोजने
3 विठ्ठल महाराज घोडके
4 भगवंत महाराज सातभाये
5 शिवाजी महाराज बावस्कर
6 ज्ञानेश्वर माऊली पठाडे
7 अर्जुन महाराज तनपुरे रविवारी दि. 22.02.2026 रोजी सकाळी 10.ते 12 या वेळेत ह.भ.प. श्री. गोविंद महाराज चौधरी यांचे काल्याचे किर्तन झाले व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला पंचकुशीतील भाविक भक्तांचे नानेगांव ग्रामस्थांना कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन झाले... अंकुश भाऊ

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा