हैद्राबाद गॅझेटिअर लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सामावेश व्हावा.....

 राजश्री राठोड यांना काही प्रश्न?


हैद्राबाद गॅझेटिअर लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सामावेश व्हावा. या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे मागील १० दिवसांपासून जयश्री पाटील (राठोड, उंबरे) यांचे उपोषण सुरु आहे.


या आंदोलनाची समाजाला कोणतीही कल्पना नव्हती. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अखंड मराठा समाजाचे एकच आंदोलन सुरु असताना दुसरे आंदोलन सुरु झाल्यामुळे मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला. आहे. राजश्री पाटील मराठा समाजासाठी आंदोलन करीत असतील तर त्यांना विरोध करण्याचे कारण नाही. परंतु खालील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर समाजाच्या मनातील संभ्रम दूर होतील


१. गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाचे सलग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आपला सहभाग जाणवत नाही. तुमच्या जिल्ह्यातूनही माहिती घेतली. परंतु आपला कोणताही सहभाग नसल्याचे समजले. आपण या आंदोलनात काही कार्य केले आहे का?


२. आपण सोशल मीडियात सक्रिय असता. परंतु गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणावर आपली एकही पोस्ट पाहायला मिळाली नाही, कारण काय?


३. आपले आंदोलन प्रकाशझोतात आल्यानंतर मराठामार्ग टीमने आपले फेसबुक अकाउंट तपासले होते. परंतु त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी आपण अकाउंटवर निवडक फोटो ठेवून कितीतरी फोटो व पोस्ट डिलीट केल्या आहेत. आपली भूमिका स्वच्छ असेल तर फोटो व पोस्ट डिलीट करण्याचे कारण काय?


४. छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण करण्यापूर्वी आपण आरक्षणासाठी एखादे आंदोलन केले होते किंवा एखादे निवेदन तरी दिले होते काय?


५. जर केले असेल तर उपोषणाला बसण्यापूर्वी सरकारला काही इशारा किंवा अल्टिमेटम दिला होता काय?


६. दोन दिवसांपासून माध्यमांवर बातम्या आल्यामुळे आपल्या आंदोलनाची माहिती जनतेला झाली. तोपर्यंत समाज अनभिज्ञ होता. आपण उपोषण सुरु करण्यापूर्वी समाजाशी संवाद केला होता काय?


७. उपोषण सुरु करण्यापूर्वी कायदेतज्ञ, अभ्यासक, संघटना, यांचा सल्ला घेतला होता का?


८. आपल्या आंदोलनाला कोणाची बॅकिंग आहे व आर्थिक मदत कोण करते हे समाजाला समजेल का?


९. आपण विदर्भातील आहात. विदर्भातील बहुतांश मराठा कुणबी झालेला आहे. मग मराठवाड्यात येऊन मराठा समाजासाठी आंदोलन करावेसे का वाटले?


१०. आपण भाजपच्या पदाधिकारी आहात. आपले आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असे समाजाने का समजू नये?


११. अखंड मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एकच आंदोलन सुरु आहे. समाजाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. उपोषण सुरु करण्यापूर्वी आपण मनोजदादांना कल्पना दिली होती काय?


१२. हैदराबाद गॅझेटिअर लागू करावे ही मनोज दादांची देखिल मागणी आहे. एक आंदोलन सुरु असताना आपण दुसरे आंदोलन सुरु केले आहे. आपण समाजामध्ये फूट पाडत आहात असे समाजाने का समजू नये?


मराठा समाजाच्या मनातील शंका दूर होण्यासाठी वरील प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे .


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....