यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास संपूर्ण जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडण्यात इशारा .........
दि. २७ वार – शुक्रवार रोजी घनसावंगी तालुक्यातील कैकाडी समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत लाभ मिळणे बाबत. उपरोक्त विषयी विनंती पूर्वक निवेदन देत आहोत कि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत जालना जिल्यातील ५,५१० घरकुल मंजूर झाले आहेत .
सदर योजने अंतर्गत भटक्या विमुक्त समाजातील बंजारा , वंजारी, धनगर या समाजाला जास्त प्रधान्य देण्यात आलेले आहे. याउलट याच कॅटेगीरीतील अतिशय उपेक्षित, वंचित,दुर्लक्षित असलेल्या कैकाडी समाजाला यामध्ये विशेष असे स्थान देण्यात आलेले नाही. तसेच कैकाडी समाजावरील लादलेले क्षेत्रीय बंधन उठवून पूर्ण कैकाडी समाजाला एससी. प्रवर्गाच्या सवलती देण्यात याव्यात.
तरी आपणास विनंती आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील
प्रत्येक खेड्यागावातून कैकाडी समाजातील किमान चार लाभार्थी सदर योजनेत समावेश करून घरकुलाचा लाभ देण्यात
यावा.
सदरील मागणी मान्य न झाल्यास अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने
संपूर्ण जिल्ह्यात व तसेच घनसावंगी मध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल . याची
संपूर्ण जबाबदारी शासनावर असेल.
अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष – श्री संजय भाऊ मेडे
, अ.भा. कैकाडी महासंघाचे मराठवाडा युवा कार्याध्यक्ष- श्री तुळशीराम निवृत्ती
जाधव, सुभाष मामा जाधव, अक्षय बोरसे, कार्तिक जाधव, अजय जाधव, सनी पवार,
ज्ञानेश्वर पवार, कृष्ण जाधव, अक्षय जाधव हे सर्व यावेळी उपस्थित होते. त्यांनी
घनसावंगी तहशील कार्यालय येथे शासनाचे कर्मचारी यांच्याकडे निवेदन दिले.
तुळजाई न्यूज –
मुख्य संपादक – कृष्णा मच्छिंद्र बरसाले
9765879656

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा