घनसावंगीत शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण आजपासून सुरु....

         जालना : घनसावंगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्व पिकाचा पिक विमा त्वरित मंजूर करण्यात यावा. संपूर्ण जालना ओला दुष्काळ जाहीर करावा. मोसंबी फळबाग नुकसान भरपाई देण्यात यावी. यावर्षीच्या दुष्काळात जिल्हाभरात ३५०० हेक्टर फळबाग या पाण्याअभावी जळून गेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई यावी .

 सन २०२२/२३  मधील ओल्या  दुष्काळाचे अनुदान तांत्रिक अडचणीमुळे मिळाले नाही ते देण्यात यावे .२०२३ मधील सोयाबीन व कापूस या पिकास देण्यात येणारे हेक्टरी ५००० रु. अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित टाकण्यात यावे.

जिल्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज वाटप बँकांनी केलेले नाही ते करावे.

२०१८ व २०२२ मधील पिक विमा मंजूर झालेला असून कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावा. व तसेच विमा सरकारी देयक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती  करण्यात यावी .

यासाठी घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यास मुळे आज दिनांक ३० सप्टेंबर २०२४ वार –सोमवार  तहसील कार्यालय घनसावंगी समोर शेतकरी गजानन रामनाथ उगले सह अनेकजन उपोषणाला बसलेले आहे . त्यांचा आज पहिला दिवस असून कोणी शासनाचा कर्मचारी त्यांच्याकडे अजून पर्यंत विचार पुस करण्यास आलेले नाही. असे उपोषण करते यांचे म्हणने आहे.     


तुळजाई न्यूज – 

मुख्य संपादक – कृष्णा मच्छिंद्र बरसाले 

                      9765879656


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....