*परभणी जिल्ह्यातील, नव्हती तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मदत करा असा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची तात्काळ दखल घेतली....*

तुळजाई न्युज परभणी जिल्हा प्रतिनिधी- जनार्दन गायकवाड -  
*वाघी-धानोरा सर्कल* मधील *नव्हाती तांडा* येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी *“मदत करा, मदत करा”* अशी भावनिक हाक देत गावात काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची तात्काळ दखल घेत *श्री.संतोषभाऊ राठोड* आणि *श्री. पिंटूभाऊ खिस्ते* यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांची परिस्थिती व शिक्षणाची गरज ओळखून *श्री संतोष भाऊ राठोड सरपंच कुऱ्हाडी* यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, ड्रॉइंग वही, स्केच पेन, नोटबुक, पेन आदी शालेय साहित्याचे वाटप केले आणि *भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष पिंटूभाऊ खिस्ते यांनी ११,१११* रुपयांची मदत दिली. तसेच *भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री माधव भाऊ राठोड यांनी २,१०० रुपये*, तर *उद्धव रखमाजी घुगे यांनी १,१००* रुपयांची मदत करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला.
या कार्यक्रमाला श्री. सतीशमामा राठोड (सरपंच वाघी), श्री. संजयभाऊ पवार (चेअरमन, भोसी), श्री. परमेश्वरभाऊ खताळ (बूथ प्रमुख, ब्राह्मणगाव), श्री. विठ्ठलभाऊ ठोंबरे (उपसरपंच, भोसी), श्री. भास्करभाऊ ठोंबरे (बूथ प्रमुख, भोसी) यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

इमेज

पुणे जिल्ह्यातील काळेवाडी नगरात "एक गाव एक मिरवणुक" काढून एक आदर्श निर्माण करुन दिला....